Agriculture Education: शाळेतील विद्यार्थी देशी गाय संशोधन केंद्राला दिली भेट

Team Agrowon

गाईच्या दुधाचे तुम्ही काय करता ?

सर, ही गाय शिंग मारते का? ते वासरू कोणत्या जातीचे आहे? आम्हाला घरी या गाई सांभाळत येतील का? या गाईच्या दुधाचे तुम्ही काय करता ? बायोगॅस कोठे वापरता ? आम्ही या कोंबड्या घरी नेऊ का? आम्हाला येथे प्रशिक्षण मिळेल का ?

Agriculture Education | Amit Gadre

गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्र

..... हे प्रश्न आहेत, शालेय विद्यार्थ्यांचे. रविवारची सकाळ, ठिकाण पुणे कृषी महाविद्यालयाचे देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्र.

Agriculture Education | Amit Gadre

विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

कृषी हा विषय शालेय शिक्षणात येणार, यावर गेले सहा वर्षे चर्चा सुरू आहे. परंतु गोऱ्हे बुद्रुक, जि .पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपक्रमशील शिक्षक रजनीकांत मेंढे सर आणि मी शाळेच्या मे महिन्यातील सुट्टीमध्ये उन्हाळी शिबिरात एक दिवस कृषी विषयासाठी देतो.

Agriculture Education | Amit Gadre

कंपोस्ट खत निर्मिती

आतापर्यंत आम्ही तुरीय लॅब च्या माध्यमातून रोपवाटिका निर्मिती, कंपोस्ट खत निर्मिती, वनीकरण असे उपक्रम गेल्या चार वर्षांत राबविले. शालेय मुले निसर्गाशी जोडली जावीत, नवे तंत्रज्ञान कळावे हा मूळ उद्देश.

Agriculture Education | Amit Gadre

शिवारफेरी

या रविवारी ( ता.७) आम्ही या मुलांना पुणे कृषी महाविद्यालयाचे देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये शिवारफेरीसाठी घेऊन गेलो. या केंद्रातील तज्ञ डॉ. सोमनाथ माने, डॉ. धिरज कणखरे यांनी एका फोनवर या शिवार फेरीचे नियोजन करून दिले.

Agriculture Education | Amit Gadre

गावठी कोंबडीपालन

त्यामुळेच या ठिकाणी मुलांना अकरा गोवंश, मुक्त संचार गोठा, मुरघास निर्मिती, गांडूळ खत, बायो गॅस प्रकल्प, दूध प्रक्रिया, सौर ऊर्जा प्रकल्प, शेणापासून मूर्तीकला आणि मुधोळ हाऊंड श्वान, लेयर कोंबडी पालन, गावठी कोंबडीपालनाबाबत सविस्तर माहिती मिळाली. हे सगळं पाहताना आम्हाला दोन तास कसे निघून गेले ते कळले देखील नाही. हे सगळे पाहताना मुले चकित होऊन गेली, काही मुलांनी वहीत नोंदी देखील घेतल्या. तज्ज्ञांना प्रश्न देखील विचारले.

Agriculture Education | Amit Gadre
Ginger | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा