Anuradha Vipat
तोंडाचा दुर्गंध ही एक अत्यंत सामान्य समस्या आहे, ज्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होतो.
लाळेची कमतरता, दातांची अपुरी स्वच्छता, किंवा पोटाचे विकार यांमुळे तोंडाला वास येतो.
बडीशेपमधील सुगंधी तेल आणि लवंगमधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म जंतूंचा नाश करतात आणि तोंडाचा वास त्वरित घालवतात.
ग्लासभर कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून दिवसातून २ वेळा गुळण्या करा.
लाळ कमी झाल्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि वास येतो. त्यामुळे दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्या.
तोंडात १ हिरवी वेलची ठेवून चघळल्याने तोंडाला तात्काळ ताजेपणा मिळतो.
एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा आल्याचा रस आणि लिंबाचा रस टाकून गुळण्या केल्यास तोंडातील जंतू मरतात.