Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाला प्रसन्न केल्यास नशीब उजळते आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होतात.
संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावल्याने पितृदोष आणि शनी दोषापासून मुक्ती मिळते.
शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किटे खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते.
शनिवारी संध्याकाळी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड वाचल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते .
आजच्या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, लोखंडी वस्तू किंवा छत्री गरजू व्यक्तीला दान करा.
शनिदेवाच्या मूर्तीसमोर बसून 'ओम शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.
आज 'बुधादित्य योग' असल्याने संध्याकाळी घरातील मुख्य प्रवेशद्वारावर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा