Farmer March : तळपत्या उन्हात कराडहून मुंबईच्या दिशेने येतोय हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा

Team Agrowon

वारी शेतकऱ्यांची

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने 'वारी शेतकऱ्यांची' कराडहून सातारच्या दिशेने निघाली आहे.

प्रीतिसंगमावर अभिवादन

माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि शेतकऱ्यांनी कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला.

farmer march | agrowon

टाळ, मृदुंगाचा गजर

रखरखत्या उन्हामध्ये शेतकरी टाळ, मृदुंग, पखवाज यांच्या गजरात पायी चालत आहेत

farmer march

मोर्चाचं नेतृत्व

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील आणि सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे हे नेते या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत.

farmer march

वाजवला टोल

पदयात्रेदरम्यान सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी पारंपरिक वाद्य असलेला ढोल वाजवला. 

farmer march | agrowon

महिलांचाही सहभाग

शेतकरी राजाचे प्रश्न सुटत नसल्याने मुंबईच्या दिशेने धडक देणाऱ्या मोर्चात शेतकरी महिलाही मागे नाहीत.

farmer march

पंगतीमध्ये जेवण

साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या पदयात्रे दरम्यान, शेतकऱ्यांसोबत पगंतीमध्ये बसून जेवण केले.

farmer march

मोर्चा मुंबईत धडकणार

जोपर्यत मागण्या मान्य होत नाही, किंवा यशस्वी तोडगा निघत नाही, तोपर्यंत हा मार्च चालणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे

farmer march
beekeeping | agrowon