sandeep Shirguppe
याचबरोबर मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात तेजी आहेच सोबत आता भाजीपाल्याच्या दरात चढउतार कायम असून, फळमार्केटमध्ये विविध फळांच्या दरातही वाढ झाली आहे.
गेली वर्ष-दीड वर्षे किरकोळ बाजारात ३८ ते ४० रुपयांवर स्थिर राहिलेल्या साखरेने उसळी घेतली आहे. अचानक उसळी घेतली. याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
सध्या बाजार सामान्यांच्या खिशाला कात्रीच लागत असल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या शेवटी अचानक साखर, साबुदाणा, ज्वारीसह सरकी तेलाच्या दरात वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात हा दर ४२ रुपये किलोपर्यंत पोहोचला. तर तूरडाळीच्या दरात किलो मागे दहा रुपयांची वाढ झालीय. पूढचे काही दिवस कडधान्ये अजून वाढण्याची भिती आहे.
रोजच्या जेवणात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या शेंगदाणा दरातही वाढ झाली असून, १६० रुपये किलो दर आहे. याचबरोबर रवा आणि पोहेच्या दरात कोणताही बदल झाला नाही.
तर साबुदाणा ८० वरून ८८ रुपयांवर पोहोचला आहे. तसेच हरभरा डाळ, मूग, मूग डाळ, मसूर डाळ, गव्हाचे दर स्थिर आहेत.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोबी, घेवडा, कारली, गवारीच्या दरात वाढ झाली आहे. टोमॅटो, ओली मिरची, ढब्बू, भेंडीचे दर किंचीत कमी झाले आहेत. पांढऱ्या वांग्याला चांगली मागणी होती.
वरणा, दोडका, काकडी, वाल, बिनीस, फ्लॉवरचे दर स्थिर आहेत. कोथिंबीरचे दर कोसळले आहेत. किरकोळ बाजारात पाच ते दहा रुपये पेंढी आहे.
कांदापात तेजीत असून, मेथी, पालक, शेपूच्या दरात घसरण झाली आहे. फळमार्केटमध्ये मोसंबी, माल्टा, पेरू, सफरचंद, अननस, डाळिंब या फळांची रेलचेल आहे.