Team Agrowon
हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मजल दर मजल करत आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ आहे.
माऊलींच्या पालखीने सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.
लाखो भाविक वारकऱ्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींच्य पालखीचे दर्शन घेतले.
माऊलींच्या चरणी लीन होत भरपूर पाऊस पडू दे, बळीराजासह सगळी जनता सुखी राहुदे, असे साकडे घातले.
बरड ता.फलटण येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सारथ्य देखील केले.
यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व नेते उपस्थित होते
हा माझ्यासाठी सर्वात भाग्याचा दिवस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
माऊलींकडे काहीही मागण्याची गरज नाही, माऊली आपल्या मनातील सर्व काही जाणतात, असे देखील त्यांनी सांगितलं.