Rupali Chakankar : तुकोबांच्या पालखी रथाच्या बैलजोडीची रुपाली चाकणकरांनी केली पूजा

Team Agrowon

आषाढी वारी २०२३

अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे काही दिवसांतच प्रस्थान होणार आहे.

Ashadhi Wari 2023 | Agrowon

मानाची बैलजोडी

यंदा पालखीच्या सारथ्याचा मान देहू गावातील सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्याा-खासदार या बैलजोडीला मिळाला आहे.

Ashadhi Wari 2023 | Agrowon

पालखी रथाचे सारथ्य

तसेच पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा-सोन्या या बैलजोडीलाही रथाचे सारथ्य करण्याचा मान मिळाला आहे.

Ashadhi Wari 2023 | Agrowon

रुपाली चाकणकर

याच पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पालखीचा मान मिळालेल्या बैलजोडीचे पूजन केले.

Rupali Chakankar | Agrowon

पालखी सोहळा २०२३

पालखीचा मान मिळालेल्या सोन्या-खासदार बैलजोडीचा धायरी येथील शेतकरी सागर टिळेकर व त्यांचा परिवार सांभाळ करतात.

Rupali Chakankar | Agrowon

बैलजोडीचे पूजन

रुपाली चाकणकर यांच्याहस्ते बैलजोडीचे पूजन करून वाजतगाजत मिरवणूक काढत ही बैलजोडी मोरे परिवाराकडे सुपूर्द करण्यात आली.

Rupali Chakankar | Agrowon

तुकाराम पालखी रथ

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा असून सनई-चौघडा गाडीला जुंपण्याचा मान चिंबळी येथील सत्यवान जैद यांच्या राजा-सर्जा या बैलजोडीला मिळाला आहे.

Rupali Chakankar | Agrowon
MIlk Production | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....