Team Agrowon
कृषीप्रधान भारतात मोठ्या प्रमाणात तांदळाची शेती केली जाते. पण सर्वसाधारणपणे तांदूळ पांढरा असतो.
गेल्या दोन वर्षांपासून कोकणातील शेतकऱ्यांचा काळ्या तांदळाच्या लागवडीकडे कल वाढला आहे.
कृषी विभागाने प्रोत्साहन योजनेमुळे कोकणात काळ्या तांदळाची लागवड सुमारे २ हजार ४०० हेक्टरवर झाली
फिलिपाईन्समध्ये व इंडोनेशियात याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
पचायला सोपा असणारा या प्रकारच्या तांदळाची लागवड पूर्वी चीनमधील राजघराण्यातल्या लोकांसाठी करण्यात येत असे.
काळ्या तांदळात दाहक-विरोधी, अँटिऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात ज्यात कर्करोगापासून संरक्षण करण्याची क्षमता असते.
हा शिजविल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा भात होतो. चवीला चांगला असून त्याला बाजारात चांगली मागणी आहे.