Rose Export : कोल्हापुरातून ‘व्हॅलेंटाइन डे’ साठीची गुलाब निर्यात पूर्णपणे ठप्प

Team Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी होणारी सुमारे ३० लाख फुलांची निर्यात यंदा पूर्णपणे ठप्प आहे.

Rose Export | Agrowon

जिल्ह्यातील गुलाब फूल उत्पादक सध्या स्थानिक बाजारपेठेवरच अवलंबून आहेत. सध्या गुलाबास देशांतर्गत बाजारपेठेत ८ ते १४ रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.

Rose Export | Agrowon

अजूनही फूल उत्पादक लग्नसराईसाठी गुलाब काढणीलाच प्राधान्य देत आहेत. अकरा तारखेनंतरच देशांतर्गत बाजारात ‘व्हॅलेंटाइन डे’साठी गुलाबाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

Rose Export | Agrowon

ढगाळ हवामानामुळे परिपक्वता लवकर आल्याने पंधरवड्यापूर्वीच फुलांची आवक बाजारात वाढली. आता आवक कमी झाली आहे.

Rose Export | Agrowon

बदलत्या हवामानामुळे फूल उत्पादकांना फटका बसत आहे. मध्यंतरीच्या काळात थंडी आणि ढगाळ हवामान असे संमिश्र वातावरण राहिले.

Rose Export | Agrowon

‘व्हॅलेंटाइन डे’च्या अंतिम टप्प्यात स्थानिक बाजारात फुलाची दरवाढ होईल, अशी अपेक्षा फूल उत्पादकांची आहे.

Rose Export | Agrowon

कोरोना पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून प्रत्येक वर्षी सुमारे ३० लाख फुलापर्यंत निर्यात होत होती.

Rose Export | Agrowon

विशेष करून शिरोळ तालुक्यात मातब्बर उत्पादक होते. २५ जानेवारीपासून हरितगृहामध्ये फुले परदेशात पाठवण्यासाठी लगबग सुरू असायची.

Rose Export | Agrowon

मागणी नसल्याने कोट्यवधी रुपयाचा दणका फूल उत्पादकांना बसला. या फटक्यातून आजपर्यंत फूल उत्पादक सावरला नाही.

Rose Export | Agrowon
Chat gpt | Agrowon