Team Agrowon
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे राज्यभरातून धनगर बांधव आले होते.
अहिल्यादेवी यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी मोठ्या उत्साहात जयंती सोहळा पार पडला.
यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त समाज बांधवांनी पारंपारिक धनगरी नृत्याचा आनंद घेतला.
तसेच रोहित पवार यांनी यावेळी केलेल्या ढोल वादनही केले. त्यांच्या या कलेने उपस्थित असलेल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं.
दरम्यान, रोहित पवार यांच्याकडून मध्यरात्रीच अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आलेल्या समाज बांधवांसाठी महाप्रसादाची सोयही करण्यात आली होती.
अहिल्यादेवी जयंतीच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने महापूजा आणि जलाभिषेक करण्यात आला.