Anuradha Vipat
यंदाच्या नवरात्रीत गरबा नाईटला सर्वात स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी डिझायनर कुर्ती हा एक उत्तम पर्याय आहे.
लेहेंग्यापेक्षा सांभाळायला सोप्या आणि दिसायला तितक्याच भारी असणाऱ्या कुर्तींचे लेटेस्ट ट्रेड्स खालीलप्रमाणे आहेत.
गरबा खेळताना छान घेर हवा असेल तर हेवी मिरर वर्क असलेली अनारकली कुर्ती निवडा.
ट्रेडिशनल चनिया-चोलीला हा एक मस्त मॉडर्न पर्याय आहे. शॉर्ट कुर्ती किंवा पेपलम टॉपसोबत फ्लोरल किंवा बांधणी प्रिंटचा स्कर्ट मॅच करा.
साध्या कुर्तीवर एखादा हेवी एम्ब्रॉयडरी किंवा कच्छी वर्क असलेला लांब श्रग घातल्यास तुम्हाला झटपट आणि युनिक लुक मिळेल.
गरब्यासाठी गुजराती बांधणी किंवा पटोला सिल्क कुर्ती कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही. यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खूप उठून दिसते.
जर तुम्हाला अगदी कम्फर्टेबल राहायचं असेल, तर शॉर्ट कुर्तीसोबत धोती सलोवार किंवा श्रग जॅकेट ट्राय करा.