Ashadhi Wari : लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला... पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण PHOTO

Team Agrowon

पंढरीच्या दिशेने सोहळा

जगतगुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटपून सकाळी पंढरीच्या दिशेने रवाना झाला.

Ashadhi Wari | agrowon

मेंढ्याचं रिंगण

काल दुपारी बारामती तालुक्यातील काटेवाडीत मेंढ्याचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Ashadhi Wari | agrowon

न्याहारीसाठी विसावला

आज सकाळी इंदापूर तालुक्यातील बेलवडी येथे पालखी सोहळा न्याहारीसाठी विसावला. सोहळा गावात आल्यानंतर पालखीचे स्वागत करण्यात आला.

Ashadhi Wari | agrowon

त्यानंतर काही वेळातच रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी परिक्रमा पूर्ण करीत होत्या.

Ashadhi Wari | agrowon

विणेकरी, झेंडेवाले धावले

त्यांच्यापाठोपाठ वाऱ्याच्या वेगाने मानाचे विणेकरी, झेंडेवाले धावले. 

Ashadhi Wari | agrowon

हरिदासांची प्रदक्षिणा

हरिदासांनी प्रदक्षिणा पूर्ण करून रिंगण सोहळ्यास चैतन्य प्राप्त करून दिले. यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.

Ashadhi Wari | agrowon

अश्वाचे आगमन

  मानाच्या अश्वांनी डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच गोल रिंगण पूर्ण करून तुकोबारायांच्या पालखीला प्रदक्षिणा घातली.

Ashadhi Wari | agrowon

नेत्रदीपक सोहळा

नेत्रदीपक रिंगणसोहळ्याने लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

Ashadhi Wari | agrowon
Ashadhi Wari | agrowon
आणखी पहा