Team Agrowon
तांदळाचे भाव (Rice Rate) झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्याभरात तांदळाच्या दरात (Rice Market) प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे.
दक्षिण भारतात उत्पादन कमी झाल्याने मध्य भारतातील तांदळाची मागणी (Rice Demand) वाढलेली आहे. परिणामी, दर वाढू लागले आहेत.
येत्या आठवड्यात पुन्हा तांदळाचे भाव वधारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निर्यात हेच बाजारात तांदळाचे भाव वाढण्याचे कारण आहे. पण यासोबत आणखी काही घटकही कारणीभूत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यापाऱ्यांकडे तांदळाचा साठा नाही. यासोबतच हवामानानेही धान उत्पादकांना साथ दिली नाही. पीक शेतात असताना अचानक वातावरण उष्ण झाले.
तसेच वेळेवर पाऊस झाला नाही. भात पीक तयार होत असतानाच पाऊस झाला. त्यामुळे उत्पन्नात सुमारे पाच टक्के घट झाली. सर्वसाधारण ग्राहकांकडूनही नवीन तांदळाची वार्षिक खरेदी केली जात आहे.