Team Agrowon
केंद्र सरकार तुकडा तांदळावरची निर्यातबंदी हटवण्याच्या मनःस्थितीत नाही. तसेच इतर तांदळावरच्या निर्यातीवरील २० टक्के कर कायम राहण्याची शक्यता आहे.
सरकारकडे तांदळाचा भरपूर साठा असूनही सरकार निर्यातीच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाही.
भारताच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचे दर चढे राहणार आहेत.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
गहू निर्यातीवर बंदी घातल्यानतंर काही दिवसांतच सरकारने तांदळाच्या बाबतीत हे निर्णय घेतले होते.
गेल्या हंगामात (२०२२) भारतातून विक्रमी तांदूळ निर्यात झाली होती.
तांदूळ निर्यातीत ३.५ टक्के वाढ होऊन ते २२२.६ लाख टनावर पोहोचले होते. थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिकेच्या एकत्रित तांदूळ निर्यातीपेक्षा भारताची निर्यात जास्त राहिली.