Anuradha Vipat
घरच्या घरी हॉटेलसारखा सुटसुटीत आणि चविष्ट व्हेज पुलाव बनवण्यासाठी खालील रेसिपी फॉलो करा.
बासमती तांदूळ, गाजर, मटार, बीन्स, फ्लॉवर आणि बटाटा, तमालपत्र, लवंगा, मिरी, दालचिनीचा तुकडा,हिरवी वेलची, कांदा , टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या.
१ चमचा शाही बिर्याणी किंवा पुलाव मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तूप/तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळलेले काजू.
तांदूळ स्वच्छ धुवून ३० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे पुलाव सुटसुटीत होतो. कुकरमध्ये तूप/तेल गरम करा. त्यात जिरे आणि सर्व खडा मसाला टाकून परता.
कांदा घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून कच्चा वास जाईपर्यंत परता. फोडणीत सर्व चिरलेल्या भाज्या आणि टोमॅटो घालून २-३ मिनिटे परता. आता त्यात हळद, पुलाव मसाला आणि मीठ टाका.
भिजवलेले तांदूळ पाण्याचा निचरा करून त्यात टाका. २ वाट्या तांदळासाठी साधारण साडेतीन वाट्या गरम पाणी घाला.
कुकरमध्ये करत असाल तर फक्त १ ते २ शिट्ट्या करा. पुलाव तयार झाल्यावर वरून कोथिंबीर आणि तळलेले काजू घालून सजवा.