Anuradha Vipat
करपलेली आणि काळवंडलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत.
भांड्याच्या तळाशी व्हिनेगर टाकून त्यात बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण रात्रभर तसेच राहू द्या आणि नंतर घासणीने घासून काढा.
भांड्यात पाणी भरून त्यात २ चमचे मीठ आणि १ चमचा डिटर्जंट पावडर टाका.
करपलेल्या भागावर लिंबाची साल घासा. लिंबातील अॅसिडमुळे काळे डाग लवकर स्वच्छ होतात.
भांड्यात पाणी आणि कापलेला कांदा टाकून ते पाणी उकळा. यामुळे जळलेले अन्नाचे कण सैल होतात.
कोरड्या भांड्यावर मीठ आणि बेकिंग सोडा शिंपडून ओल्या स्पंजने गोलाकार हालचालीत घासल्यास बाहेरील काळेपणा कमी होतो
लोखंडी कढईसाठी अर्ध्या कापलेल्या लिंबाने मीठ लावून घासल्यास गंज आणि काळेपणा लवकर निघतो.