Anuradha Vipat
गवती चहा हा केवळ त्याच्या अप्रतिम सुगंधासाठीच नाही, तर आरोग्यासाठीच्या अनेक औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो.
आयुर्वेदामध्ये गवती चहाला 'आजारपणावर गुणकारी औषध' मानले गेले आहे.
यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.
सर्दी, खोकला, घसा खवखवणे किंवा ताप आल्यास गवती चहामध्ये आले आणि काळी मिरी घालून काढा बनवून प्यायल्याने छातीतील कफ बाहेर पडतो.
याचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
पोटाच्या समस्यांवर गवती चहा अत्यंत गुणकारी आहे. हे पोटातील गॅस, अपचन, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते.
गवती चहा हा एक उत्तम नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे. हा चहा प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिझम वाढते