Roshan Talape
रतन टाटा यांनी 'टाटा समूह आणि टाटा ट्रस्ट' मार्फत शेतीत योगदान दिले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी उपक्रम राबवले आहेत.
'टाटा ट्रस्ट' शाश्वत शेतीला प्रोत्साहन देत असून, या ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना हवामानानुसार योग्य पिकांची निवड, पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आणि जैविक शेतीचे शिक्षण दिले जाते.
'टाटा केमिकल्स'च्या टाटा किसान संसार या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांसारख्या शेतीसाठी आवश्यक संसाधनांसह मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाते.
'टाटा ॲग्रीको' हा शेतीसाठी उच्च दर्जाची कुदळ, विळा, आणि इतर हँड टूल्स बनवणारा प्रमुख ब्रँड असून, शेतकऱ्यांना विश्वासार्ह साधनांचा पुरवठा करतो.
रतन टाटा यांनी 'DeHaat' सारख्या कृषी-टेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली असून, हे स्टार्टअप्स शेतकऱ्यांना संपूर्ण कृषी सेवा, सल्ला, आणि बाजारपेठांपर्यंत सेवा प्रदान करतात.
टाटा स्ट्राइव्ह कौशल्य विकास उपक्रम ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण देते. यामुळे त्यांना शेती व कृषी व्यवसायात नवीन संधी मिळून उत्पन्न वाढवण्यात मदत होते.
रतन टाटा यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि शाश्वत शेतीचे प्रोत्साहन मिळाले आहे.