Bailgada Sharyat: बैलगाडा शर्यतीत रंगली चुरस; विजेत्यांना लाखोंची बक्षिसे

Team Agrowon

श्री शकुंबरवली बाबा, मुक्ताबाई माता आणि रोकडोबा महाराज उत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यातील चऱ्होली खुर्द (ता.खेड) येथे भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली.

Bailgada Sharyat: | Agrowon

२७ ते ३१ मार्च दरम्यान या उत्सवाला प्रचंड गर्दी झाली. शुक्रवारी या उत्सवाची सांगता बैलगाडा शर्यतीने झाली.

Bailgada Sharyat: | Agrowon

सभापती श्री रामदासशेठ नामदेव ठाकुर पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे त्यासाठी विशेष निमित्त ठरले. आमदार दिलीप आण्णा मोहिते यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले.

Bailgada Sharyat: | Agrowon

बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने सकाळपासूनच परिसरातील वातावरण अतिशय उत्साहाचे होते. बैलगाडा शर्यतीच्या अंतिम सामन्यासाठी लाखोंची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली.

Bailgada Sharyat: | Agrowon

अंतिम विजेत्यांना महेंद्रा थार आणि दोन न्यू हॉलंड ट्रॅक्टर देण्यात येणार आहे. तसेच २५ दुचाकी गाड्याही विजेत्यांसाठी बक्षीस म्हणून ठेवण्यात आले आहे.

Bailgada Sharyat: | Agrowon

त्यामुळे बैलगाडा शर्यत अत्यंत चुरशीची झाली. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी या उत्सवाला हजेरी लावली.

Bailgada Sharyat: | Agrowon
Ice Apple | AGrowon