Bharat Jodo Yatra: राहूल गांधीसोबत रघुराम राजन…

Anil Jadhao 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा करत आहेत. ही यात्रा राजस्थानात पोहोचली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

राजस्थानमधील भदोती येथून आज सकाळी राहूल गांधी यांच्या भारत जोडा यात्रेला प्रारंभ झाला होता. या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत रघुराम राजन सहभागी झालेले दिसले.

रघुराम राजन यांनी यात्रेत सहभागी होत पाठींबा दिला. त्यामुळे आज भारत जोडो यात्रा चर्चेत आली. 

रघुराम राजन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान चालताना दिसले. दोघांनी एकमेकांशी चर्चाही केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसत आहे.

कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. भारताच्या इतिहासातील कोणत्याही भारतीय राजकारण्याने पायी काढलेला हा सर्वात लांब पदयात्रा आहे, असा दावा काँग्रेसने केला.

cta image