Rabi Sowing: देशातील रब्बी लागवडीला वेग

Anil Jadhao 

देशातून माॅन्सूनने माघार घेतली आहे. परतीच्या माॅन्सूनने देशातील अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र रब्बी पेरणीसाठी पाण्याची उपलब्धता झाली. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच देशातील काही भागांमध्ये रब्बी पिकांची पेरणी सुरु झाली.

देशात आत्तापर्यंत २५ लाख १५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली. मागीलवर्षी याच काळातील पेरा १७ लाख २२ हजार हेक्टरवर झाला होता. म्हणजेच यंदा ४६ टक्क्यांनी लागवडीखालील क्षेत्र वाढले.

आत्तापर्यंत झालेल्या एकूण लागवडीत मोहरीचे क्षेत्र सर्वाधिक १५ लाख हेक्टरवर आहे. यंदा मोहरीची लागवड ४० टक्क्यांनी आघाडीवर आहे. मागील हंगामात जवळपास ११ लाख हेक्टरवर मोहरीची पेरणी झाली होती.

हरभऱ्याची लागवड जवळपास ४ लाख हेक्टरवर झाली. तर मागील हंगामात याच कालावधीत २ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र हरभऱ्याखाली होतं. मात्र गव्हाची पेरणी अद्याप सुरु झालेली नाही.

देशातील एकूण लागवडीपैकी राजस्थानमध्ये जवळपास १२ लाख हेक्टरवर मोहरीचा पेरा झाला. मागील हंगामात केवळ साडेसात लाख हेक्टर मोहरीखाली होतं.

तर ४ लाख हेक्टर क्षेत्र हे उत्तर प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशात २ लाख ८० हजार हेक्टरवर मोहरीचा पेरा झाला. मागील हंगामात याच काळातील लागवड मात्र सव्वातीन लाख हेक्टरवर होती. 

cta image