Team Agrowon
कोरडवाहू ज्वारीची पेरणी वेळेवर पाऊस पडल्यास १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीतच केली असल्यास चांगले उत्पादन मिळते.
रब्बी हंगामातील पिकांमध्ये कोळपणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोळपणीमुळे तणांचे नियंत्रण होते.
पहिली कोळपणी तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दुसरी कोळपणी पाचव्या आठवड्यात फासेच्या कोळप्याने करावी,
वाळलेले गवत तूरकाट्या इत्यादींचा प्रति हेक्टरी ५ टन आच्छादन केल्यास उष्णतेमुळे उडून जाणारा ओलाव्यात बचत केली जाते.
रब्बी ज्वारीच्या उथळ जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली या वाणांची निवड करावी.