Abhijeet Katake: पुण्याचा पैलवान अभिजित कटके ठरला 'हिंद केसरी'

Team Agrowon

महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटकेने आता हिंदकेसरी खिताब पटकावला आहे. 

Abhijeet Katake | Agrowon

हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळाला.

Abhijeet Katake | Agrowon

अंतिम फेरीत त्याने हरियाणाच्या सोमवीरचा ५-० असा पराभव केला.

Abhijeet Katake | Agrowon

हिंदकेसरी कुस्तीचं आयोजन भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं करण्यात आलं.

Abhijeet Katake | Agrowon

पहिल्या फेरीत चार गुणांची आघाडी घेतलेल्या अभिजितने सोमवीरला आक्रमणाची संधी मिळू दिली नाही.

Abhijeet Katake | Agrowon

गुणांची बढत घेऊन सोमवीरवर दबाव वाढवला. दुसऱ्या फेरीत नकारात्मक कुस्ती करीत असल्याने पंचांनी सूचना देऊन तीस सेकंदात गुण घेण्याची सोमवीरला सूचना दली.

Abhijeet Katake | Agrowon

मात्र तीस सेकंदात तो अभिजितचा भक्कम बचाव भेदण्यात अयशस्वी ठरल्याने पंचांनी अभिजितला एक गुण दिला.

Abhijeet Katake | Agrowon

शेवटच्या मिनिटांत सोमवीर आक्रमक झाला मात्र अभिजितपुढे त्याची डाळ शिजली नाही. पाच विरुद्ध शून्य गुणांची कमाई करून अभिजितने प्रतिष्ठेची लढत खिशात टाकली.

Abhijeet Katake | Agrowon
Banana | Agrowon