Anuradha Vipat
काही फळांमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते जे तुमच्या शरीरातील कमतरता भरून काढण्यास मदत करू शकतात.
एका कप पेरूमध्ये सुमारे ४.२ ग्रॅम प्रथिने असतात. यात फायबर आणि व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते.
ॲव्होकॅडोमध्ये प्रथिनांसोबतच निरोगी फॅट्स असतात.
किवी हे केवळ रोगप्रतिकारशक्तीसाठीच नाही तर प्रथिनांसाठीही उत्तम आहे.
मध्यम आकाराच्या केळ्यात सुमारे १.३ ग्रॅम प्रथिने असतात. व्यायामानंतर केळी खाणे फायदेशीर ठरते.
फणस हे मांसहार करणाऱ्यांसाठी प्रथिनांचा एक चांगला शाकाहारी पर्याय मानला जातो.
एक कप कापलेल्या जर्दाळूंमध्ये सुमारे २.२ ग्रॅम प्रथिने आढळतात.