Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचे बक्षीस वितरण; कुणाला मिळाले ट्रॅक्टर आणि थार कार?

Team Agrowon

संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ६५ व्या राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले.

Maharashtra Kesari | Agrowon

महाराष्ट्र केसरी मुख्य किताब विजेता, उपमहाराष्ट्र केसरी, १८ वजनी गटातील विजेते, सांघिक विजेते, उपविजेते यांना घोषित केलेल्या थार, टॅक्ट्ररसह जावा गाड्या व अन्य बक्षिसांचे वितरण झाले.

Maharashtra Kesari | Agrowon

कोथरुड येथील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये झालेल्या या समारंभात यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' ठरलेला शिवराज राक्षे याला महिंद्रा थार गाडी व रोख पाच लाखाचे बक्षीस, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीस देण्यात आले.

Maharashtra Kesari | Agrowon

येजडी जावा गाडी गादी विभागात आतिष तोडकर (बीड, ५७ किलो), भारत पाटील (को. शहर, ६१ किलो), सोनबा गोंगाणे (को.जिल्हा, ६५ किलो), विनायक गुरव (को. शहर, ७० किलो), रविराज चव्हाण (सोलापूर जिल्हा, ७४ किलो),

Maharashtra Kesari | Agrowon

रोहीत अहिरे (नाशिक जिल्हा, ७९ किलो), प्रतिक जगताप (पुणे जिल्हा, ८६ किलो), कालिचरण सोलनकर (सोलापूर जिल्हा, ९२ किलो), ओंकार चौघुले (को.जिल्हा, ९७ किलो), शिवराज राक्षे (नांदेड, खुला वजन गट) यांना, तर माती विभागात सौरभ इगवे (सोलापूर शहर, ५७ किलो), ज्योतिबा अटकळे (सोलापूर जिल्हा, ६१ किलो),

Maharashtra Kesari | Agrowon

सुरज कोकाटे (पुणे जिल्हा, ६५ किलो), अनिल कचरे (पुणे जिल्हा, ७० किलो), श्रीकांत निकम (सांगली, ७४ किलो), विशाल कोकाटे (सातारा, ७९ किलो), अर्जुन काळे (भंडारा, ८६ किलो), बाबासाहेब तरंगे (पुणे जिल्हा, ९२ किलो), सारंग सोनटक्के (मुंबई उपनगर, ९७ किलो), महेंद्र गायकवाड (सोलापूर जिल्हा, खुला वजन गट) यांना गाडी व रोख बक्षिसे देण्यात आली.

Maharashtra Kesari | Agrowon
Sharad Pawar | Agrowon