Swapnil Shinde
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड नुकसान झाले.
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी बुधवारी राजधानी शिमलातील आपत्तीग्रस्त भागाला भेट दिली.
प्रियांका यांनी बुधवारी सकाळी समरहिल, कृष्णनगर आणि कनालॉग येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
प्रियाका यांच्यासोबत मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री उपस्थित होते.
प्रियांका यांनी मृतांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांचे सांत्वन केले. यावेळी मृतांचे नातेवाईकही भावुक झाले.
संसदेच्या विशेष अधिवेशनात हिमाचल प्रदेशला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी प्रियांका यांनी केली.
पंतप्रधान आणि केंद्र सरकारने राज्याला विशेष मदत करावी, अशी मागणी केली.