Team Agrowon
सर्पदंश झाल्यावर घाबरू नये, त्यावर इलाज उपलब्ध आहे. तंत्रमंत्राने विष उतरत नाही, कुठल्याही तांत्रिक किंवा मांत्रिकाच्या नादी लागू नये, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. त्यामुळे होईल तेवढे लवकर डॉक्टरांकडे घेऊन जावे.
साप चावलेल्या जागेवर चिरा मारू नये तसेच तोंडाने विष ओढण्याचा प्रयत्न करू नये. आवळपट्टी बांधू नये, दंश झालेल्या जागी बर्फ लावू नये तसेच मालिश करू नये.
स्वत: उपचार करू नये, तसेच कुठलेही वनस्पती, मसाले इ. वापरू नये. सर्पदंश झाल्यास १०४, १०८, ११२ या क्रमांकावर कॉल करून गाडीची व्यवस्था करणे.
सर्पदंश झालेल्या व्यक्तीस हालचाल करू देऊ नये, पट्टा, दागिन कडे, अंगठी, घड्याळ काढून टाकावे. कारण दंश झालेल्या जागेवर सूज येऊ शकते. मिळेल त्या वाहनाने रुग्णास जवळच्या रुग्णालयात पोहोचविणे.
रुग्णास रुग्णालयात नेताना डाव्या कुशीवर झोपवून त्याचा उजवा पाय दुमडून उजवा हात चेहऱ्याखाली ठेवावा. त्यामुळे श्वास नीट घेता येईल. उलटी झाल्यास श्वसननलिका बंद होणार नाही. दंशाबद्वलची सर्व माहिती डॉक्टरांना द्यावी.
बाहेर जाताना बुटांचा वापर करणे. रात्रीच्या वेळी टॉर्चचा वापर करणे.
खाली जमिनीवर झोपणे टाळणे व मच्छरदाणीचा वापर करणे. घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे व उंदरांची संख्या नियंत्रित ठेवणे.