Poultry Rate : मागणी घटल्याने चिकनचे दर कमी झाले

Anil Jadhao 

देशभरात सध्या लम्पी स्कीन आजारानं थैमान घातलंय. मात्र लम्पी आजारामुळे पोल्ट्रीच्या जिवंत पक्ष्यांच्या दरात घसरण झाल्याच्या अफवा बाजारात आहेत.

राज्यात मागील एक महिन्यात जिवंत पक्ष्याचा दर म्हणजेच पोल्ट्री उत्पादकांना मिळणार दर प्रतिकिलो १३० रुपयांपर्यंत पोचले होते. मात्र त्यात आता घट झाली. जिवंत पक्ष्यांचा दर आता ९७ रुपयांपर्यंत कमी झाला.

लम्पी स्कीन आजारामुळं हा दर कमी झाल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहेत. तसचं पोल्ट्री उत्पादकही हेच मानत आहेत. पण जाणकारांच्या मते लम्पी स्कीन आजार आणि पोल्ट्रीचा काही संबंध नाही.

गोवंशामध्ये लम्पी आजार पसरल्यानंतर बाजारात मटणाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळं चिकनला मागणी वाढली होती. नेमकं त्याच काळात पोल्ट्रीचा पुरवठा मर्यादीत होता. त्यामुळं जिवंत पक्ष्याचे दर सुधारले होते.

मात्र पतृपक्ष आणि नवरात्रीमध्ये मासांहार टाळला जातो. परिणामी चिकन आणि अंडीला मागणी कमी झाली. त्यामुळं जिवंत पक्ष्याचे दर कमी झाले. या काळात दरवर्षी दर कमी होतात. त्याचा लम्पी आजाराशी संबंध नाही.

जिवंत पक्ष्याचे दर मागणी घटल्याने कमी झाल्याचे वास्तव आहे. पण अफवा पसरुन गैरसमज केला जात आहे. त्याला उत्पादकांनी किंवा ग्राहकांनी बळू पडू नये, असं आवाहन जाणकारांनी दिले आहे.

cta image
येथे क्लिक करा