Team Agrowon
शेतीसह अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालनाचा देखील व्यवसाय करतात. त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे कोंबडीपालनाचा.
कोंबड्यापासून मिळणाऱ्या अंड्यांना बाजारात मागणी आहे. त्याशिवाय पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या उपयोग चिकनसाठी केला जातो.
अनेक मांसाहारी प्रेमी चिकनला अर्थात कोंबडीच्या मांसाला पसंती देतात. अशातच कोंबडीची एक नवी प्रजाती आहे. त्याला सध्या मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे.
या कोंबडीच्या प्रजातीला 'डोंग ताओ' किंवा 'ड्रॅगन चिकन' असं म्हणतात आहे. जगातील सर्वात महागड्या कोंबड्यांमध्ये त्याची गणना होते.
सध्या ही कोंबडी फक्त व्हिएतनाममध्येच आढळते. मात्र जगभरात या कोंबडीला मागणी आहे. सध्या भारतातील अनेकांना या कोंबडीबद्दल कोणतीही माहिती नाही.
या कोंबडीची बाजारातील किंमत भारतीय चलनात १.६३ लाख इतकी आहे. ही कोबंडी प्रामुख्याने व्हिएतनाममध्येही खाल्ली जाते.
त्यामुळे भारतातही या कोंबडीचे पालनपोषण करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. त्यासाठी या कोंबडीच्या जातीचे मूळ भारतात आणावे लागेल.