Anil Jadhao
मागीलवर्षी महाष्ट्रात अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस यामुळं डाळिंबाचं मोठं नुकसान झालं होतं. यामुळं बाजारपेठेत डाळिंबाची आवक घटली होती.
पाऊस आणि कीड-रोगामुळे डाळिंबाची गुणवत्ता खालावली होती. परिणामी बाजारात या डाळिंबाला दर मिळाला नाही.
महाराष्ट्राच्या पाठोपाठ राजस्थान आणि गुजरातमध्ये डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. राजस्थानमध्ये १५ हजार हेक्टर तर गुजरातमध्ये २० हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड आहे.
राजस्थान आणि गुजरातमधून राज्यात डाळिंब दाखल झाले. याचा परिणाम राज्यातील डाळिंब दरावर झाला होता. त्यामुळे याचा फटका राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. मात्र यंदा ही परिस्थिती निर्माण होणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.
राजस्थान आणि गुजरातमध्ये वर्षापर्यंत हस्त बहार धरला जायचा. परंतु, वातावरणातील बदलामुळे अंबिया आणि हस्त हे दोन्ही बहर धरले जातात. राजस्थानमध्ये ६० टक्के आणि गुजरातमध्ये ३५ टक्के क्षेत्रावर हस्त बहर धरला जातो.
राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांत पाऊस झाला. पण डाळिंब पट्ट्यात फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळं डाळिंब बागा वाचल्या. पोषक वातावरण असल्यान बागा उत्तमप्रकारे साधल्या आहेत.