Tur Market : देशातील बाजारात तुरीची आवक कमीच

Anil Jadhao 

देशातील बाजारात सध्या तुरीची आवक कमीच आहे. तुरीची आयात सध्या जास्त असली तरी त्याचा निपटारा लगेच होत आहे. त्यामुळं शिल्लक साठा उरत नाही.

मागील हंगामातील तुरीचा स्टाॅक नफावसुलीसाठी हळूहळू बाजारात येतो आहे. एरवी तूर बाजारात दाखल होण्यापूर्वी आधीच्या हंगामातील तूर बाजारात येते. मात्र यंदा त्याचं प्रमाण कमी राहीलं.

डिसेंबर महिन्याचा विचार करता गेल्यावर्षी याच महिन्यातील आवकेच्या तुलनेत यंदा ४६ टक्क्यांची घट झाली. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ७७ हजार टन आवक झाली होती. तर यंदा केवळ ४२ हजार टनांवर आयात स्थिरावली.

बाजारात तुटवडा असून दर वाढलेले आहेत. महाराष्ट्रातील आवक तब्बल ६२ टक्क्यांनी कमी राहीली. तर यंदा कर्नाटकात तूर उत्पादन कमी असण्याचा अंदाज आहे.

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कर्नाटकातील तूर आवक कमी होण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातही तूर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकूणच देशातील तूर उत्पादन यंदा कमी राहील.

सध्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.