Team Agrowon
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील डाळिंब महाराष्ट्राच्या बाजारपेठेत दाखल झाले होते. त्यामुळे राज्यातील डाळिंबाच्या दराला त्याचा फटका बसला होता.
परिणामी दरात घसरण झाली होती. यंदाच्या हंगामात डिसेंबर महिन्यात डाळिंबाची आवक होईल, अशी शक्यता डाळिंब संघाने वर्तवली होती.
परंतु डिसेंबर महिन्यात फारशी आवक झाली नसल्याचे चित्र आहे.
मुंबई बाजारपेठ वगळता इतर कोणत्याही बाजारपेठेत आवक झाली नाही.
गुजरातमध्ये २० हजार तर राजस्थानमध्ये १५ हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यापैकी दोन्ही राज्यातील शेतकरी अंबिया आणि हस्त बहराकडे वळाले आहेत.
मृग हंगामातील डाळिंबाच्या क्षेत्रात घट झाली असल्याचा अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे. यामुळे महाराष्ट्रात मृग हंगामातील डाळिंबाची आवक घटली आहे.