Shevanti Farming : योग्य वेळी करा शेवंतीची लागवड

Team Agrowon

शेवंतीला पसंती

फुलांचा आकार, आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ म्हणतात.

Shevanti Cultivation | Agrowon

जमीन

शेवंती पिकासाठी योग्य जमिनीची निवड नेहमीच फायदेशीर ठरते. ज्या जमिनीचा सामू साडेसहा ते सात आहे, अशा जमिनी लागवडीसाठी चांगल्या असतात.मध्यम हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.

Shevanti Cultivation | Agrowon

लागवडीची वेळ

पाण्याची उपलब्धता नसेल, तर जून-जुलैमध्ये लागवड करता येते. पावसाळा सुरू झाल्यानंतर केलेल्या लागवडीस डिसेंबरपासून पुढे फुले येतात. म्हणजे नाताळ सण व लग्नसमारंभासाठी ती उपलब्ध होतात. 

Shevanti Cultivation | Agrowon

जातींची निवड

जगात शेवंतीच्या १५ ते २० हजार जाती असून, भारतात सुमारे ५०० जाती आढळतात. महाराष्ट्रात सोनाली तारा, बग्गी, झिप्री, राजा, पांढरी व पिवळी रेवडी, शरदमाला, बंगळूर, रतलाम चंद्रमा आदी जाती लागवडीखाली आहेत.

Shevanti Cultivation | Agrowon

खत व्यवस्थापन

शेवंतीच्या उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीपूर्वी जमीन तयार करताना हेक्‍टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी १५० ः २०० ः २०० टन शेणखत जमिनीत मिसळावे, लागवडीच्या वेळी हेक्‍टरी १५०ः २०० ः २०० किलो नत्र-स्फुरद-पालाश तर लागवडीनंतर एक ते दीड महिन्याने १५० किलो नत्र हेक्‍टरी याप्रमाणात द्यावे.

Shevanti Cultivation | Agrowon

पाणी व्यवस्थापन

लागवडीपासून पाऊस सुरू होईपर्यंत पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी द्यावे. फुले येण्याच्या व फुलण्याच्या काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

Shevanti Cultivation | Agrowon

आंतरमशागत

वेळोवेळी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे. निंदणीमुळे जमीन भुसभुशीत राहून पिकाची जोमदार वाढ होते. झाडाची वाढ मर्यादित राहण्यासाठी आणि अधिक उत्पादनासाठी शेवंतीच्या झाडाचा शेंडा खुडण्याचा प्रघात आहे.

Shevanti Cultivation | Agrowon
Wedding Gift | Mukund Pingale
आणखी पाहा...