Sahaydri Photography : आजच्या भटकंतीत टिपलेली फोटो

Team Agrowon

निळ्या आसमंताखाली पर्वतावर हिरव्याकंच पर्णसंभार असलेल्या कोवळ्या रानकाट्यांना फुटली आहे पालवी..!

आहेत सज्ज त्यांना मनसोक्त रूतण्यासाठी हक्काच्या माझ्या नाजूक हळव्या टाचा..!!

Photography | Manoj Kapde

कालच्या भटकंतीत पांढऱ्या शुभ्र रानफुलांनी वाटा सजवल्या होत्या. भ्रमर आणि मी असे दोघेच तेथे होते. मला रानफुलांनी भरभरून सुगंध दिला आणि भ्रमराला खूप सारा मकरंद वाटला.

Photography | Manoj Kapde

देवळासमोर नंदी बसलेला आहे. शेकडो वर्षांपासून. लोकांनी पाय तोडले, तोंड फोडले; पण नंदी जागचा हालला नाही. त्या पिंडीवरील त्याची श्रध्दादेखील कमी झाली नाही.

Photography | Manoj Kapde

दुर्गराज रायगड चढताना मला दोन प्रकारच्या पायऱ्या दिसल्या. शिवकालीन पायऱ्या (उजव्या बाजूच्या) कातळात कोरून तयार केलेल्या असत.

Photography | Manoj Kapde

गाव असो की पाडा, शहर असो की महानगर... तेथे सेवासुविधा येतात त्या ज्ञात अज्ञात महिलांच्या कष्टातून. श्रमिक स्त्री ही नवसमाजाची, संस्कृतीची त्यागी रचनाकार आहे.

Photography | Manoj Kapde

आजच्या भटकंतीत भेटलेली रानफुले..!

Photography | Manoj Kapde

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये भटकंती करताना एका शेतकऱ्याच्या झोपडीत गेलो; घरात गरिबी इतस्ततः पसरलेली होती. मात्र, कोपऱ्यात तांब्याच्या धातूपासून जुन्या काळात घडवलेली मोठी तीन भांडी रचून ठेवल्याचे दिसले. "ही भांडी आमच्या आजोबांच्या लग्नातील आहेत," असे शेतकऱ्याने सांगितले. याचा अर्थ '२००-२५० वर्षांपूर्वी पर्वतरांगांमध्ये श्रीमंती होती', असादेखील काढता येईल..!

Photography | Manoj Kapde
Tractor | Agrowon