मनोज कापडे
पोटात अन्न, अंगात कपडा आणि पायात वहाण नसताना मैलोन मैल चालत रहातात. तरीही ती नेहमी हसरी दिसतात. आपण आलिशान एसी मोटारीत फिरूनसुद्धा थकलेलो असतो..!
भाकरीसाठी चूल पेटवावी लागेल. त्याची ही तयारी..!
आज सकाळी वाड्यावर गेलो होतो..!
माकडीण पुढे म्हणाली, "आम्ही हेच करतो. त्यामुळे आमच्या जंगलात शाळा नाही आणि वृद्धाश्रमदेखील नाही..!"
सह्याद्रीमधील काही पर्वत निसर्गाने त्याच्या तसविरीत मनःपूर्वक सांभाळून ठेवले आहेत. या तसविर जंगलात जावे लागले. एका निसर्ग तसविरीतील दाट झाडीतून दिसणारा दूरवर दिसणारा आमचा लाडका राजगड..!
राजाधिराज याच वाटेने मुरुंबदेव पर्वतावरून भुलेश्वर पर्वतरांगा पार करीत तोरणजाई देवीच्या पर्वताकडे जात असत. काल मीदेखील या वाटेने गेलो. तेथील दऱ्याखोऱ्यांमध्ये अजूनही गुंजत आहेत स्वराज्याच्या तुताऱ्यांचे मुक्त नाद..!
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील आनंददायी पाऊस आणि स्वप्नवत धुके आता नाहीसे झाले आहे. दुपारी सूर्यदेव चांगलेच तळपत असल्याने काही पर्वतावरील कारवीच्या पानांनी मान टाकली आहे..!