Anuradha Vipat
मासिक पाळीदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात, ज्यामुळे पोटदुखी, क्रॅम्प्स आणि मूड स्विंग्सचा त्रास होतो.
या दिवसांत आराम मिळवण्यासाठी आणि त्रास टाळण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे पूर्णपणे टाळले पाहिजे.
जास्त मीठ असलेल्या पदार्थांमुळे शरीरात पाणी साठून राहते, ज्यामुळे पोट फुगणे आणि सूज येण्याचा त्रास वाढतो.
गोड पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि लगेच कमी होते, ज्यामुळे मूड स्विंग्स आणि थकवा जास्त जाणवतो.
चहा किंवा कॉफीमधील कॅफिनमुळे नसा आकुंचन पावतात, ज्यामुळे गर्भाशयाचे क्रॅम्प्स (पोटदुखी) तीव्र होऊ शकतात.
फास्ट फूड आणि ट्रान्स फॅट्स असलेल्या पदार्थांमुळे शरीरात जळजळ वाढते आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात.
या दिवसांत पचनक्रिया संवेदनशील असते. अति तिखट खाल्ल्याने पोटात जळजळ, गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो.