Anuradha Vipat
शेंगदाणा दही आतड्यांसाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांतील बॅक्टेरिया संतुलित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
शेंगदाण्यांमध्ये असलेले फायबर आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियासाठी उत्तम आहार आहे, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.
चला तर आता पाहूयात दही-शेंगदाणा रेसिपी
साहित्य
एक वाटी दही ,अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे, थोडेसे मीठ ,थोडीशी साखर ,थोडेसे जिरेपूड
दह्यामध्ये शेंगदाणे, मीठ, साखर आणि जिरेपूड मिक्स करा. चांगले एकजीव करून घ्या. तुम्ही हे मिश्रण तसेच खाऊ शकता किंवा थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करू शकता
तुम्ही दह्यामध्ये मध किंवा इतर फळेही मिक्स करू शकता. जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील, तर तुम्ही बदाम किंवा इतर कोणत्याही प्रकारचे नट्स वापरू शकता.
शेंगदाणे आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियासाठी उत्तम आहार आहे, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.
दह्यामध्ये असलेले प्रथिने आणि शेंगदाण्यांमधील फायबरमुळे पोट भरलेले वाटते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.