Anuradha Vipat
मुलांचे संगोपन करताना अनेकदा पालक नकळतपणे अशा काही चुका करतात.
पालकांनी टाळायला हव्यात अशा काही महत्त्वाच्या चुका खालीलप्रमाणे आहेत.
"बघ तो किती हुशार आहे" किंवा "तिला किती चांगले गुण मिळाले" असे म्हणून मुलांची तुलना करु नका.
मुलांच्या चुकांवर ओरडण्यापेक्षा त्या सुधारण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा.
पती-पत्नीमधील भांडणे किंवा घरातील वाद मुलांसमोर करणे टाळा. यामुळे मुलांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते
मुलांना स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या. प्रत्येक गोष्ट तुम्हीच करून दिली, तर त्यांना जबाबदारीची जाणीव होणार नाही.
मोबाईल किंवा कामात व्यस्त राहण्याऐवजी मुलांशी संवाद साधा. संवादाच्या अभावामुळे मुले मोबाईल किंवा चुकीच्या संगतीच्या आहारी जाऊ शकतात.