Team Agrowon
हे वाण संकरित वाणासारखेच दिसते. उंची एकसारखी म्हणजे १७० ते १८० सेंमी असून एकाच वेळी पक्व होते.
पीक ११० ते ११५ दिवसात परिपक्व होते.
या वाणाचा कडबा अधिक पौष्टिक आहे. त्यामुळे जनावरांना चांगल्या प्रतीचा कडबा सहज उपलब्ध होतो.
काळी काजळी (ग्रेन मोल्ड) रोगास हे वाण सहनशील आहे.
दाणे पांढरेशुभ्र असून भाकरी चवीला गोड, चविष्ट आणि टिकाऊ बनते.
उंची कमी असल्यामुळे काढणी सहजपणे करता येते.
परभणी शक्ती वाणाच्या ज्वारीच्या दाण्यांमध्ये प्रति किलो ४२ मि. ग्रॅम लोह असून २५ मि. ग्रॅम जस्ताचे प्रमाण आहे.