Team Agrowon
मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. .
नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.
धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 4 इंचावर आहे.
कोल्हापूरमधलं राधानगरी धरण 94 टक्के भरलं आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
धोका पातळी 43 फुटांवर आहे. पण पाणी पातळी सध्या स्थिर आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठच्या लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.