Anuradha Vipat
घुबड घरात येणे किंवा दिसणे अशुभ असण्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
विज्ञानाच्या नजरेतून घुबड हा एक अत्यंत उपयुक्त आणि निष्पाप निशाचर पक्षी आहे.
हिंदू धर्मग्रंथ आणि वास्तू शास्त्रानुसार, घुबड हे धनदेवता माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते.
अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी घुबड दिसणे किंवा पांढरे घुबड पाहणे हे आगामी आर्थिक लाभाचे आणि प्रगतीचे शुभ संकेत मानले जातात .
दुसरीकडे, शकुन शास्त्रानुसार घुबडाचा रात्रीचा कर्कश ओरडण्याचा आवाज किंवा घराच्या छतावर बसणे याला काही लोक संकटाचे किंवा मृत्यूचे सूचक मानतात.
जर एखादे घुबड चुकून तुमच्या घरात किंवा बाल्कनीत आले, तर घाबरून जाण्याची किंवा त्याला अशुभ मानून मारण्याची अजिबात गरज नाही.
घुबड हा रात्रीच्या अंधारात सक्रिय राहणारा पक्षी आहे . त्याच्या डोळ्यांची रचना अशी असते की त्याला दिवसापेक्षा रात्री स्पष्ट दिसते.