Swapnil Shinde
अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलिजनंतर 20 दिवसानंतरही धुमाकूळ घालतो.
आपल्या व्यस्त लाईफ स्टाईलमध्येही देओल कुटुंबीय आपला बहुतेक वेळ लोणावळ्यातील फार्महाऊसवर घालवतात.
या फार्म हाऊसमध्ये मोठा तलावही आहे.
देओल कुटुंबियांच्या फार्महाऊस 100 एकरवर असलेल्या या फार्म हाऊसमध्ये सध्या धर्मेंद्र राहतात.
चारही बाजूने डोंगरांनी वेढलेल्या ठिकाणी असलेल्या फार्म हाऊसमध्ये अनेकदा सनी, बाॅबी आणि हेमा मालिनी यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य येतात.
फार्म हाऊसमध्ये अनेक प्रकारे फळ बागा आहेत. तसेच सेंद्रीय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करत असतात.
देओल कुटुंबीय फार्महाऊसवर रिसॉर्ट किंवा हॉटेल उघडण्याचा विचार करत आहेत.