Team Agrowon
शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन एक उत्तम पर्याय आहे.
कोल्हापुरातील शेतकरी श्री महादेव बिडकर यांची वडीलोपार्जित अर्धा एकर शेती आहे त्याच्यामध्ये ते ऊस पिक घेतात शेतीसोबत जोडधंदा म्हणून त्यांनी शेळी पालन चालू केले आहे.
मित्रमंडळी व युट्युब वरून माहिती घेऊन 2021 मध्ये श्री बिडकर यांनी सहा हजार रुपयांना दोन शेळ्या घेतल्या वर्षभरात त्याच्या मधून त्यांना दोन बोकड एक शेळी व सध्या दोन लहान पिल्ले असे एकूण पाच शेळी व बोकड तयार झाले आहेत.
वर्षभरात त्यांनी दोन बोकड विकून जवळपास 16 हजार रुपयांची कमाई केलेली आहे व सध्या दोन बोकड आहेत त्यामधील एक ते विकणार आहेत त्याची किंमत जवळपास आठ हजार एवढी होईल असे त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी सांगितले की आणखी शेळ्यांमध्ये वाढ करणार आहे यावेळेस त्यांना व्यवसायात येणाऱ्या अडचणी विषयी विचारले असता त्यांनी सांगितले शक्यतो जास्त कोणते आजार शेळ्यांना होत नाहीत पण प्रत्येक शेळीवर वैयक्तिकपणे लक्ष ठेवावे लागते.
तसेच ते स्वतः चारा व मक्याचे प्रत्येकी 50 ग्रॅम मका खाद्य स्वरूपात देतात. आठवड्यातून एक पोते लेंडी खत त्यांना शेळ्यांपासून मिळते त्याचा वापर ते स्वतःच्या शेतामध्ये करतात.
शेळी पालन व्यवसायात शेतकऱ्यांना भविष्यात चांगल्या संधी आहेत म्हणून शेतकऱ्यांनी शेळीपालनाकडे वळावे असे आवाहन त्यांनी यावेळेस केले.