Team Agrowon
अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी सत्ता मिळविल्यानंतर तेथील शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी सत्ता काबिज केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अफूच्या शेतीवर बंदी घालण्याचे फरमान सोडले होते.
जे शेतकरी अफूची शेती सुरू ठेवल्यास संपूर्ण शेत जाळून टाकून त्या शेतकऱ्यांना कैद करण्याची चेतावनीही देण्यात आली होती.
दरम्यान, युरोपमध्ये विकली जाणारी हेरोईन ही अफगाणिस्तानमध्ये पिकवल्या जाणाऱ्या अफुपासून तयार केली जाते. गेल्या पाच महिन्यांपासून हे अभियान सुरू आहे.
सध्या तालिबान सरकारकडून नंगरहार प्रांतामध्ये अफूची शेती नष्ट करण्याचे अभियान सुरू आहे.
दरम्यान, तालिबानने बजावलेल्या अफू शेतीवरील बंदीच्या फरमानानंतर यावर यश मिळविल्याचे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे.
युकेच्या एका कंपनीच्या सॅटेलाईटच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अफगाणिस्तानातील अफूची शेती सुमारे ८० टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, १९९० मध्येही तत्कालीन सरकारने अफगाणिस्तानात अफू्च्या शेतीवर बंदी घालत अफूची शेती बेकायदेशीर असल्याचे त्यावेळी म्हटले होते.