Team Agrowon
सध्या राज्यात कांद्याचे भाव (Onion Rate) घसरले आहेत.
त्यामुळे नाफेड मार्फत अतिरिक्त २ लाख टन खरेदीचे उद्दिष्टय निश्चित करावे अशी मागणी छगन भुजबळ (Changan Bhujbal) यांनी केली आहे.
तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही माहिती दिली.
२०२२ मध्ये किंमत स्थिरता निधी योजने अंतर्गत नाफडेने २.३८ लाख टन कांद्याची खरेदी केली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तराद्वारे दिली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, राज्यात कांदा पिकाला अपेक्षित दर मिळत नाही.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले. त्यामुळे कांदा दराबाबत सरकारने धोरण आखावे, अशी मागणीही कांदा उत्पादक करत आहेत.