Team Agrowon
सोमवारी (ता. २७) नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला कमीत कमी १ रुपये, तर जास्तीत जास्त प्रति किलो १० रुपये दर मिळाला.
कांद्याला दर मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.
नगर जिल्ह्यात वर्षभरात साधारण एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार हेक्टरपर्यंत कांदा लागवड व्हायची.
यंदा केवळ रब्बीमध्ये एक लाख ८० हजार हेक्टर कांदा लागवड झाली असून अजूनही काही ठिकाणी लागवडी सुरूच आहेत.
गेल्या दीड वर्षापासून कांद्याला फारसा दर नाही.
यंदा तर कांद्याचा दर गेल्यावर्षी पेक्षाहूनही खाली आला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून नगरसह जिल्ह्यातील विविध बाजार समितीत कांद्याचा दर जास्तीत जास्त प्रति किलो १२ रुपयांपेक्षा अधिक नाही.
जास्तीत जास्त प्रति किलो १० रुपये दर मिळत असला तरी कमीत कमी १ रुपये प्रति किलोचा नीचांकी दर मिळाला आहे.