Ruturaj Patil: शेतकऱ्याच्या पीक नासधूसाची बातमी समजताच आमदार पोहचले थेट शेतात!

Team Agrowon

संवदेनशील नेता

कॉँग्रेसचे दक्षिण कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील नेहमीच चर्चेत असतात ते त्यांच्या संवदेनशीलतेमुळे.

Ruturaj Patil | agrowon

अज्ञातांनी नुकसान केलं

त्यांच्या मतदारसंघातील सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील शेतकरी आप्पासाहेब चव्हाण यांच्या शेतातील पिकांचं अज्ञातांनी नुकसान केलं.

Ruturaj Patil | agrowon

टोमॅटो, कारले व मिरची पिकांची नासधूस

चव्हाण यांचं हातातोंडाशी आलेल्या टोमॅटो, कारले व मिरची पिकांची नासधूस केली.

Ruturaj Patil | agrowon

वरणा पिकाची नासधूस

तसेच संजय खोत यांच्या शेतातील वरणा पिकाची अज्ञात समाजकंटकांनी नासधूस केल्याची बातमी समजताच ऋतुराज पाटील यांनी तात्काळ तेथे भेट देऊन माहिती घेतली.

Ruturaj Patil | agrowon

आर्थिक मदतीचा हात

तसेच आर्थिक मदतीचा हात दिला. लांबलेला पाऊस, पाण्याची कमतरता यातून मार्ग काढत शेतकरी पिकांना जीवापाड जपत आहे.

Ruturaj Patil | agrowon

पिकाची समाजकंटकांनी केलेली नासधूस

पिकाची समाजकंटकांनी केलेली नासधूस संवेदनशील माणसांच्या डोळ्यात पाणी आणणारी आणि निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया या पाहणी वेळी त्यांनी व्यक्त केली.

Ruturaj Patil | agrowon
Sitafal | Agrowon