Monsoon Season : आता आस लागली ती मॉन्सूनची

Team Agrowon

हवामान खात्यावरचा लोकांचा अविश्वास

बेभरवशाच्या सरकारी हवामान खात्यावरचा लोकांचा विश्वास उडाला तेव्हा लोक स्वयंघोषित हवामान तज्ञाच्या नादी लागले.

Monsoon Season | Agrowon

अंधश्रद्धा

मग त्यांनी ही कीर्तनकार बुआ बाबा, महाराज लोकासारखे तारखा बुक करुन सुपारीवर कार्यक्रम लावून स्वतः चे उखळ पांढर करुन घ्यायला सुरवात केलीय.

Monsoon Season | Agrowon

व्हिडिओ वर लोकांचा विश्वास

आलीकड त्यांचा खुप सुळसुळाट सुरु झालाय,युट्युबला त्यांचे व्हिडिओ पाहाता पाहाता लोकांच्या डोळ्याचे खसाडं व्हायची वेळ आलीय,आभाळात आलेल्या ढगाकडे न पाहाता लोकं त्यांचे विडिओ, मॅसेज पाहून पावसा विषयी बोलू लागले आहेत.

Monsoon Season | Agrowon

हवामानाने आपला असली रंग दाखवायला

एका तज्ञांने सांगितलं मे मध्ये तुफान पाऊस आहे, दुसरा म्हणाला जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या होतील,तिस-यांने सांगितले जून कोरडा जाण्याची शक्यता आहे,सगळ्या तज्ञांना फाट्यावर मारुन हवामानाने आपला असली रंग दाखवायला सुरुवात केलीय.

Monsoon Season | Agrowon

बापाने लावलेला पावसाचा अंदाज खरा

मृग नक्षत्र सुरु झालयं तरीअद्याप पर्यंत आमचा भागात अजून पावसाचा थेंब ही पडला नाहीय,त्यात गेल्या महिन्यात पक्ष्यांने काटेरी झाडावर केलेल्या घरट्याच्या निरीक्षणावर बापाने लावलेला पावसाचा अंदाज खरा ठरलाय.

Monsoon Season | Agrowon

कृषीविभागांकडून देण्यात येणा-या सल्ल्याकडे

पेरणीसाठी शेतक-यांने राज्याच्या कृषीविभागांकडून देण्यात येणा-या सल्ल्याकडे लक्ष द्यावे,हे सगळे एकूण प्रकरण पाहून मला वाटतं झाडून सगळे स्वयंघोषित हवामान तज्ञ दिवसभर नुसते नांगरटीने दांडाळावेत.

Monsoon Season | Agrowon
Apple | Agrowon