Team Agrowon
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने जमिनीच्या हिस्सेवारीत तुकडे पडत आहेत. त्यामुळे कमी जागेत आणि वेळेत जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन पर्यायांच्या शोध सुरू आहेत.
शेती करायला चांगली जमीन लागते. पण अनेक देशांनी पृथ्वीच्या बाहेर म्हणजेच अंतराळात शेती सुरू केली आहे.
अंतराळातील आणि पृथ्वीवरील वातावरणात मोठा फरक आहे.
चीन अंतराळात अनेक प्रकारच्या पिकांची शेती करत आहे. यामध्ये लुयुआन 502 या गव्हाच्या प्रजातीचा देखील समावेश आहे.
नासा ही अमेरिकेची अंतराळ संस्था अंतराळात शेती करत आहे. नासाने त्यांच्या अंतराळातील शेतीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.
अंतराळात पाठवलेले पिकांचे बीज सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात राहतात. त्यांना कॉस्मिक किरणांचा सामना करावा लागतो.
ही प्रक्रिया पिकांच्या विकासाची आणि परिवर्तनाची क्रिया वेगवान करण्यास मदत करतात. त्यामुळे अंतराळातील पीकं कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास तयार होतात.