Team Agrowon
शेती संदर्भात कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम जमिनीचा ७/१२ उतारा मागितला जातो.
हा ७/१२ उतारा काढायचा म्हंटले तर तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करावा लागतो.
मागील काही वर्षांपासून महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या पोर्टलवरून हे उतारे ऑनलाइन पध्दतीने काढता येत आहेत.
आता हीच सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या मोबाइल ॲपवरून उपलब्ध होणार आहे.
हे मोबाइल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून ॲन्ड्रॉईड, ॲपल मोबाइलसाठी ॲप्स स्टोअरवरून उपलब्ध करून दिले आहे
या पोर्टलवरून नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत आहेत. यासाठी १५ रुपयांत उपलब्ध होत आहे.
यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उताऱ्याची प्रिंट मिळविण्यासाठी महा-ई सेवा केंद्र किंवा झेरोक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता.
आता उमंग मोबाइल ॲपवर डिजिटल स्वरूपात उतारा उपलब्ध होणार असून, त्याची प्रिंट न काढताच अन्य व्यक्तीला अथवा कार्यालयांना तो पाठविता येईल